
Marathi Prem Kavita | Love Poem In Marathi | मराठी प्रेम कविता | Marathi Kavita On Love| मराठी सुंदर प्रेम कविता

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
Marathi Prem Kavita : “प्रेम” आयुष्यात ज्याला होत त्यालाच त्याच महत्व कळत, जेव्हा दोन जिवांच्या पसार्यात एकमेकांची काळजी घेतली जाते ती खरी प्रेमळ आपुलकी.
‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं….तुमचं आणि आमचं एकदम सेम असतं’ प्रेम म्हटलं की, मंगेश पाडगावकरांची ही कविता (Marathi Prem Kavita) आठवणार नाही. असं मुळीच होणार नाही. प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असली तरी मनात भावना या नेहमीच त्या असतात.
तर मग मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Love Poem In Marathi | मराठी प्रेम कविता चा एक सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत, मला आशा आहे तुम्हाला हे Love Poem In Marathi | मराठी प्रेम कविता चा संग्रह नक्की आवडेल.
गुलाबाचं फुल देणं
प्रेम असतं
पाकळीसमान तिला जपणं
प्रेम असतं,
तिला हसवणं म्हणजे
प्रेम नसतं
तिच्या सुखासाठी आपलं हसणं
प्रेम असतं,
तिला नेहमी सावरणं
प्रेम नसतं
सोबत राहून साथ तिची देणं
म्हणजे प्रेम असतं
प्रेम कधी रुसण असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतसुद्धा!
दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं- मंगेश पाडगावकर
आयुष्यभर कोणासाठी तरी थांबणे
म्हणजे प्रेम,
कोणीतरी सुखात असल्याचा आनंद
म्हणजे प्रेम,
कोणासाठी तरी रडणारे मन
म्हणजे प्रेम,
आणि कोणाशिवाय तरी मरणे
म्हणजे प्रेम
बघताच तुझ्या रूपाला
हरूनी गेलो, बेहबान…!!
आणखी माहिती वाचा :Birthday Wishes For Wife In Marathi | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
बघताच तुझ्या रूपाला
हरूनी गेलो, बेहबान…!!
का कुणास ठाऊक
बघतात,तुझ्याकडे
हारूनी गेलं, माझं भान
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
बघता तुझा तो चेहरा…!!
वेडवले ते माझं मन
वेडवले ते माझे मन…!!!
तुझ हसन मी miss करतोय…
तुझ डोळे मिटुन, तिरक्या कोणात
मला पाहन मी miss करतोय !!!!
तुझ्या चेहऱ्याचा एकन एक कण…
रोमांच फ़िरवत असतो…
माझ्या मनाच्या कागदा वर…
तुझ माझ्यामध्ये हरवुन जाण मी miss करतोय !!!!
माझी आर्त हाक का नाही पोहचत आहे…
ही जीवघेनी शांतता त्यात खुप खुप दुर असतानाही…
माझ्या अगदी जवळ तुझ असन मी miss करतोय!!!!
गुरफ़टवुण टाक मला तुझ्या मीठीत…
वेढुण टाक मला तुझ्या केसांन मधुन…
कधीच नको आहे जिथुन सुटका मला !!!!
हात तुझा हातात आल्यावर स्मित ओठांवर पसरु दे,
गजरा माळतांना केसांत तुझ्या मीच फुल बनुन फुलु दे !!
हास प्रिये एकदाच मला क्षणभर तरी जगु दे,
होईन तुझसाठी फुलपाखरु तुझ्या तळव्यावरी बसुदे !!
होईन घन निळा मी तुला चिंब करुन जाऊदे,
हास प्रिये एकदाच मला क्षणभर तरी जगु दे !!
होईन तान मी त्या कान्हाची तुला गुंग करुनी जाऊदे,
होईन मोरपीस मी तुझसाठी वा-यावरी मज ऊडु दे !!
हास प्रिये एकदाच मला क्षणभर तरी जगु दे,
हात तुझा हातात आल्यावर स्मित ओठांवर पसरु दे !!
खरं प्रेम आयुष्यभराची साथ असतं
आज आहे उद्या नाही
असं त्यात कधीच नसतं
एकमेकांच्या प्रेमाच फुलपाखरु
प्रेमात कधीही इकडे तिकडे उडून
जात नसतं
कारण आपलं प्रेम हे नेहमी खास असतं
भेट जाहली पहिली तेव्हा
सांज पेटली होती
रिमझिम वर्षेतूनि लालसा
लाल दाटली होती
काळ लोटला आज भेटता
नदी आटली होती
ओठांवरती उपचारांची
सभा थाटली होती- कुसुमाग्रज
तुझ्या त्या
नजरेतील नजाकतीला
कसलीच तोड नाही
मला आता तुझ्याशिवाय
कसलीच ओढ नाही
तुझ्या निखळ मनात
अडकून राहायला होतं
तुझ्या निरागस हसण्यात
हरवून जायला होतं
तुझ्या आवाजातील बंदिश
जीव ओढून नेते
तुझ्या डोळ्यातील अश्रू
माझे प्राण घेते
या वेड्यांचे प्रेम फक्त
तुझ्यावरच असेल
तू प्रेम दे अथवा नको देऊस
पण साथ मात्र माझी नेहमी असेल!
कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात ,
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ,
साद घाली मना,
झोंबणारा हा गार वारा
शहारलेलं सर्वांग त्या लाटांपरी,
भावनाही उधाणलेल्या,
त्यावेळी लाभलेला तू
एक प्रेम किनारा!
जाते म्हणतेस हरकत नाही ,
कढत अश्रू पाहून जा
नाते तोड्तीस हरकत नाही
विझता श्वास पाहून जा
जाणून सारे संपवताना
हीच एवढी विनंती
हसत आहेस हरकत नाही
बुडती नाव हळूच पाहून जा
जाळते आहेस हरकत नाही
जळणार माझ मन फक्त एकदा पाहून जा…………
प्रेम माझे तुझ्या साठी
मनात का राहिले…!
तू आज तरी मिळशील
मजला ते का बोलले…!
वाट तुझी ही वीणा
कारण मन माझे पाहिले…!
ना तुला हे कळाले…!
ना मला हे कळाले…!
प्रेम तुझे ना पाहता
मनास का हे भाळले…!
प्रेमात तुझ्या जगण्या
साठी घोट मधाचे मी घेटले…!
नाम तुजे ना माहीत मला
प्रेम तुजवर मी केले…!
वीणा कारण मी स्वप्न
तुझे हे आसे आज सजवले…!
प्रेम माझे तुझ्या साठी
मनात का राहिले…!
तुज्या रुपाचे चित्र मी
मनात का रंगविले…!
आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस
जे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते
आज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस..
आली आहेस तर तुला एकच मागणे मागतो
तुझे हे प्रेम माझ्यासाठी असेच जपुन ठेव..
जगण्याचे कारण आहे प्रेम तुझे
असेच ते जपुन ठेव..
माझे आयुष्य तर कधीच संपले होते
माझा प्राण बनुन तु आलीस..
मरेल ग तु दुर गेलीस तर
मला तुझ्या मिठित ठेव..
आज तु पुन्हा प्रेमाची जाणिव करुन दिलीस
वेळ असेल तुला तर
एकदा मला भेटशील का ?
दोन शब्द बोलायच होत
थोड ऐकून घेशील का
…पहिला तू माझ्याशी
खुप काही बोलायचास
वेळ नसला तरी
माझ्यासाठी खुप वेळ काढ़ायचास
तासन तास माझ्याशी
खुप गप्पा मारायचास
नसले विषय तरी
नविन विषय काढ़ायचास
काही ही बोलूंन
मला खुप खुप हसवायचास
माझा फ़ोन एंगेज असला की
खुप खुप रागवायचास
दिवस भर माझ्याशी
कट्टी फू करायचास
आता कशाला आमची गरज पडेल
अस सारख चिडवायचास
माझा चेहरा पडला तर
खुप नाराज होयचास
हळूच जवळ घेउन
सॉरी बोलायचास
आज ही मला तुझा
सारखा होतो भास्
कारे असा वागतोस
का देतोस त्रास
नाही पुन्हा भेटणार
एकदा बंद पडल्यावर श्वास
एकदाच भेट मला
पुन्हा नाही देणार त्रास.
तुझ्या प्रत्येक सुखात
भागीदार व्हायचं …
तुझ्या प्रत्येक दुखात तुझा
आधार व्हायचं …..
तुझ्या प्रत्येक श्वासातला
श्वास व्हायचं …..
तुझ्या प्रत्येक ठोक्यातील
भाग व्हायचं… …
तुझ्या मनातील वेदनांचे
मलम व्हायचेआहे…..
देवा जवळच्या प्रार्थनेतील
मागणं व्हायचं… .
तुझ्या अंधारलेल्या जीवनातील
दिवा व्हायचं… ..
तुझ्या डोळ्यातील स्वप्न व्हायचं
तुझ्या हसण्याचे कारण
व्हायचे आहे….
श्वासाच्या शेवटल्या क्षण
पर्यंत तुझ व्हायचं…
पान जरी कोरं असलं,
तरी पानालाही भावना असतात.
मन जरी वेडं असलं,
तरी मनालाही भावना असतात.
पानाच्या भावना कोणालाच कळत नाहीत,
मनाच्या भावना मनालाही कळत नाहीत.
मनं हे असचं असतं,
इकडून तिकडे बागडत असतं.
मनाला काही बंधनं असतात,
म्हणुन तर ह्र्दयात स्पंदनं असतात
मला पाहताच तुझं हृदय धडधडावं
कोणाची पर्वा न करता, तुझ्या डोळ्यांनी मला एकटक बघावं
मी ऐकत नसतानाही, तू बडबड करावं
असं ही कधीतरी घडावं ……
तुझं हृदय माझ्या प्रेमात पडावं
माझ्या एका शब्दासाठी तू हि तरसावं
स्वप्नात मी येईल या आशेने, रात्र-दिवस झोपावं
असं ही कधीतरी घडावं ……
मी कोणाशी बोलताना त्याने ही थोडं जळावं
स्वताचा हक्क गाजवून माझ्यावर प्रेम करावं
आज मी झुरते त्याच्यासाठी, त्याने हि थोडं झुरावं
असं ही कधीतरी घडावं ……
Leave a Reply