
Funny Jokes In Marathi | भन्नाट मराठी जोक्स | Marathi Comedy Jokes | भन्नाट मराठी जोक्स व छोटे छोटे विनोद | जबरदस्त मराठी विनोद फनी चुटकुले

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
Funny Jokes In Marathi : भन्नाट मराठी जोक्स व छोटे छोटे विनोद आणि बिनधास्त व खळखळून हसा आणि हे मराठी विनोद शेअर करून दुसऱ्यांनाही हसवा. आपण रोजच्या आयुष्यात इतके धकाधकीचे आयुष्य जगत असतो आणि इतके तणावात असतो की आपल्याला रोजच्या जगण्यात थोडं हसू गरजेचे असते. हसल्याशिवाय दिवस म्हणजे अगदी कंटाळवाणा. अनेक भन्नाट मराठी जोक्स अर्थात मीम्सही हल्ली सोशल मीडियावर असतात जे आपल्याला हसवतात.
तर मग मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Funny Jokes In Marathi | भन्नाट मराठी जोक्स चा एक सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत, मला आशा आहे तुम्हाला हे Funny Jokes In Marathi | भन्नाट मराठी जोक्स चा संग्रह नक्की आवडेल.
मोलकरीण: बाईसाहेब तुमच्या मुलाने
मच्छर खाल्ले,
बाईसाहेब: माझ तोंड काय बघतेस
डॉक्टरला बोलाव,
मोलकरीण: आता घाबरण्याचे कारण
नाही बाईसाहेब..
मी त्याला All Out पाजले आहे.
दांडिया खेळताना ज्यांच्याकडे कोणी बघत पण नसतं,
त्या मुली पण “परी हु मै” गाणं लागल्यावर असा Attitude दाखवतात,
कि आता पंख बाहेर येतील आणि ह्या उडतीलच..
सासू: “कित्ती वेळा सांगितलंय बाहेर जातांना टिकली लावत जा”
सूनबाई: “अहो सासूबाई, जीन्सवर कुणी टिकली नाही लावत”
सासू: “अगं जीन्सवर नाही, कपाळावर लाव, भवाने !”
आणखी माहिती वाचा :Birthday Wishes For Wife In Marathi | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल, तर अविवाहित असतांना बदला.
लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल पण बदलू शकत नाही
गणपतीला दोन बायका असतात,रिद्धी आणि सिद्धी
सामान्य माणसाला एकच बायको असते, ती पण जिद्दी
देव – मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय पाहिजे…?
गण्या – पैशांनी भरलेली Bag, नोकरी आणि
एक मोठ्ठी गाडी ज्यामध्ये खूप सुंदर मुली असतील.
देव – तथास्तु
(गण्या आता कंडक्टर आहे)
पोलीस – काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री…?
बंड्या – प्रवचन ऐकायला…
पोलीस – कोणत्या विषयावर प्रवचन आहे…?
बंड्या – दारूपासून होणारे दुष्परिणाम
पोलीस – एवढ्या रात्री कोण देत प्रवचन…?
बंड्या – माझी बायको…
बायको – नेहमी माझं अर्ध डोक दुखत राहते.
वाटतंय डॉक्टरला दाखवायला हवं…
नवरा – अरे त्यात काय दाखवायचं…!
जितकं आहे तितकंच दुखणार ना…!
बस्स…! तेव्हापासून नवऱ्याचे संपूर्ण अंग दुखत आहे.
घरात बायकोने फरशी पुसल्यावर असं
चालावं लागतंय
जस काय
.
.
आतंकवाद्यांनी बॉम्ब पुरवून ठेवलेत.
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
तीन उंदीर गप्पा मारत असतात.
पहिला – मी विषारी गोळ्या आरामात चघळतो.
दुसरा – मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो.
तिसरा लगेच उठतो आणि जायला लागतो,
पहिला आणि दुसरा विचारतात,
काय झालं कुठ चालला…?
तिसरा – आलोच, मांजरीचा कीस घेऊन…
भक्त – देवा,
मी पापी आहे.
मला दुःख द्या.
दर्द द्या. मला बरबाद करून टाका.
माझ्यामागे भूत सोडा…
देव – नाटक का करतोयस…!
सरळ सरळ सांग ना, तुला बायको पाहिजे.
एक भिकारी देवाला म्हणतो…
हे देवा मला खाण्यासाठी असं काहीतरी दे जे,
खाल्ल्यावरसुद्धा संपले नाही पाहिजे…
देव – हे घे पूर्ण एक चिंगम…
नवरा – माझ्या छातीत खूप दुखायला लागलंय…
ताबडतोब अँब्युलंसला फोन लाव…
बायको – हो लावते, तुमच्या मोबाईलचा
पासवर्ड सांगा बर…!
नवरा – राहू दे, थोडं बर वाटतंय आता…!
“… कुलूप सापडलं नाही.मग दरवाज्यावर,
“COVID-19 POSITIVE”
ची पाटी लावून तसाच निघून गेलो भाजी आणायला…!”
सदाशिव पेठ, पुणे
पुढे वाचा
घरी चोरी झाली होती …. भिंतीवर लिहून ठेवले होते
आम्ही PPE Kit घालुनच व लस घेऊनच फिरतो सध्या …
चोर पण पुण्याचे
मागच्याच आठवड्यात नर्सने मला *वय ४५ वर्षावरील वाटत नाही*
या कारणाने लस दिली नाही….. हे माझ्या बायकोने जरा जास्तच मनावर घेतलं.
मग बायकोने घरी येऊन *संतूर* तर लपवलाच पण सोबत *हेयरडाय, रेझर* वगैरे सगळंच लपवलं.
मग आज ती मला पूर्ण तयारीने घेऊन गेली.
नर्स लस टोचतांना म्हणाली….
“बाबा, लवकर यायचं नां हो…. तुमच्या बरोबरच्या लोकांचे दोन दोन डोस झाले सुद्धा….बरं झालं…., तुमच्या सुनबाई चांगल्या आहेत म्हणून आत्ता का होईना तुम्हाला डोस द्यायला घेऊन आल्या…”
*आता कुठे तिचा जीव शांत झाला.
साहेब आपल्याला कोरोना विरुद्ध लढावं लागेल…
साहेब-का???काही बोलला का तो,आपल्या विरुद्ध
बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना,
आज रात्री मी पूरी करणार आहे..
नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो..
लागला ना डोक्याला शॉट,
वाचा नीट परत एकदा
सासू: “कित्ती वेळा सांगितलंय
बाहेर जातांना टिकली लावत जा”
सूनबाई: “अहो सासूबाई, जीन्सवर
कुणी टिकली नाही लावत”
सासू: “अगं जीन्सवर नाही,
कपाळावर लाव, भवाने !”
बॉस : ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता .
गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते..
कुठे ही जाऊ नका, पाहत रहा ABP माझा.
नितेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला
मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?
नितेश : ते नंतर, आधी पोहे, चहा आणि मुलगी बघणे तर होऊ द्या, मग बसू !
मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो.
मुलगा: बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत..
आई: हरामखोर, त्या तुझ्या मावश्या आहेत (Funny Jokes In Marathi)
गुरुजी– काय समजले नसेल तर विचारा..
बंड्या– गुरुजी फळा पुसल्यावर फळ्यावरील अक्षरे कुठे जातात
गुरुजी डोकं आपटून मेले
तिचा फोन आला, खूप अकडत अडकत ती म्हणाली,
विसरुन जा मला
मी म्हणालो, आधी नाव तरी सांग कोण आहेस तू? (Funny Jokes In Marathi)
बायकोचा बदला
त्या दिवशी घरी आलो. जेवायला बसलो. स्वयंपाक अगदीच बेचव होता.
वैतागून बायकोला म्हणालो ‘जेवण अगदीच बेचव आहे. काहीच चव नाही’.
बायको शांतपणे उठली व डॉक्टरांना फोन केला.
‘ह्यांच्या तोंडाला चवच नाहीये’.
थोड्या वेळातच ambulance आली व मला उचलून घेऊन गेली.
गेले दोन आठवडे मी quarantine centre मध्ये ऍडमिट आहे.
इथं घराबाहेर सुद्धा जाता येत नाही ,
आणि पेपरमध्ये आजचे राशिभविष्य आलंय ,
प्रवासाचा योग आहे..
अँबुलन्स येते कि काय.
एकाच वेळी मास्क,गॉगल आणि इयरफोन ला सांभाळून घेतल्याबद्दल, मी माझ्या कानाला सलाम करतो
त्या चिनी लोकांना वाईटही तर नाही बोलू शकत.
तुमच्या तोंडात किडे पडो
पार्टी दिल्यासारखं होईल नालायकांना.
कोणी लिहिले माहीत नाही पण मजेदार आहे
शिक्षक : मुलांनो , उद्या वर्गात येताना कोरोना वर निंबध लिहून आणा..
मन्या : सर मी करोनावर निंबध लिहीला आहे :
”कोरोना”
कोरोना हा एक नवीन सण असून तो *२०२०* सालापासून सुरु झाला तसेच तो दिवाळी सारखा एक मोठा सण आहे. होळीच्या नंतर येतो आणि पुष्कळ दिवसापर्यंत राहतो.
*चीनने या सणाची सुरुवात केली असली तरी संपूर्ण जगात लोक एकाच वेळी हा सण साजरा करतात* . तसेच हा एकमेव असा सण आहे जो. हिंदु मुस्लिम ♀️ख्रिश्चन बौद्ध अश्या सर्व धर्मांतील तसेच श्रीमंत गरीब व मध्यम वर्गीय लोकही साजरे करतात.
*ह्या सणात खूप सारे खाण्याचे फराळ घरी बनविले जातात. सर्व मिळून घरात आनंदाने राहतात*. शाळेला पुष्कळ दिवसांपर्यंत सुट्टी असते . दुकाने, ऑफिस सर्व बंद असतात. टीव्ही वर कार्यक्रम पहायला मिळतात. सर्व जण मिळून हा सण साजरा करतात.
*या सणात तोंडाला मास्क लावून आणि एकमेकांपासून लांब ♂️अंतर ठेवून हा सण साजरा करतात. या सणात पुरुष मंडळी दिवसभर बर्मुडा आणि टी शर्ट घालून केर फरशी भांडी घासत बसतात तर बायका फक्त स्वयंपाक करतात अन् मोबाईल बघत बसतात*
पण हा सण बाहेर रस्त्यावर एकत्र येऊन साजरा केल्यावर दोन ते तीन दिवसात तो *हॉस्पिटल* मध्ये एकट्याने साजरा करावा लागतो. व काळजी नाही घेतली तर देवाच्या घरी जावे लागते…
*………असा हा करोना सण
माझा एक मित्र आहे
तो कधी कधी इतके दर्दभरे स्टेटस टाकतो की, मी पण त्याच्या गर्लफ्रेंडला मिस करतो
खरे मित्र तेच असतात जे मदत करण्यापूर्वी जगातल्या सगळ्या शिव्या ऐकवतात
कृष्णाला सोळा हजार बायका होत्या
तरीही तो आपला मित्र सुदामाला विसरला नाही
आणि इकडे आमचे मित्र एक पोरगी पटली तर साधा मित्राचा फोनही उचलत नाहीत
दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात
पहिला मित्र – जाऊ दे यार चल आत्महत्या करू
दुसरा – येडा झालास का तू
पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून सुरूवात करावी लागेल…
चिनी टिव्हीवर लेटेस्ट जाहिरात
सर आम्ही तुम्हाला चक्क वटवाघूळ खाताना बघतोय
माझ्या आवडीचे वटवाघूळ , साप , खवल्या मांजर , कावळा , कुत्री असे चमचमीत पदार्थ मी नेहमीच खातो
तरी इतका फिटनेस
चिंग टिंग पिंग ऑईल
चिंग टिंग पिंग ऑईल असेल घरी
तर फिटनेसची चिंता डोंट वरी
स्वत:ला इतकं मजबूत बनवा की,
एखाद्याने दगड जरी फेकून मारला
तर दगडाचा भुगाच झाला पाहिजे.
मित्र :- एवढ्या उशीर पर्यंत ऑनलाईन काय करतोय….?
मी :- वाट बघतोय….?
मित्र :- कश्याची….?
मी :- बॅटरी लो होण्याची….
दोन वाघ झाडाखाली आरामात बसले होते….
समोरून एक ससा जोरात पळून गेला….
पहिला वाघ ( दचकून ):- आयला, काय गेलं रे….?
दुसरा वाघ :– काही नाही रे, फास्ट फूड होत……
अरे हित नाकात कापूस घालायाची वेळ आली आलिये.
आणि ह्या बायकांच वेगळच चालू आहे.
नथीचा नखरा challenge
डॉक्टर – बाई, तुमच्या नवऱ्याच्या सगळ्या टेस्ट झाल्यात
आणि
सगळेच रिपोर्ट नॉर्मल आले आहेत…
काही कळतच नाहीये,
यांना नेमकं काय झालंय ते…?
बाई (काळजीच्या सुरात) – अहो डॉक्टर साहेब, ते
पोस्ट मार्टम का काय असत, ते तरी करून पहा एकदा…!!!
(पेशंट फरार आहे…)
तलवार पास होने से कुछ नहीं होता,
तलवार चलाना भी आना चाहीये…
असे Status टाकणारे पोर डॉक्टरने
इंजेक्शन काढले की,
मोठमोठ्याने रडतात…!!!
माझे काही मित्र एवढे रिकामटेकडे आहेत
कि, बसल्या बसल्या
मुंग्यांचा रस्ता अडवून बोलतात…
आता कुठून जातेस बघतोच…!!!
काल एकाला उधारी मागण्यासाठी
घरच्या लँडलाईन वर फोन केला,
तर तो म्हणतो,
“अरे यार, थोडा वेळाने फोन कर…
मी आता गाडी चालवतोय…..”
एका लग्नाच्या कार्यालयात एका माणसाला
मुलीकडचे विचारतात, “तुम्ही वर पिता का ?”
उत्तर – तसं काही नाही.
खाली व्यवस्था केली असेल तरीही चालेल…
बायको तिच्या मैत्रिणीला – अग काल दिवसभर नेट चालत नव्हते…
मैत्रीण – मग काय केले…?
बायको – काही नाही ग, नवऱ्याबरोबर गप्पा मारत होते.
चांगला वाटला ग स्वभावाने…
नवरा – साजणी, तुझ्या केसांच्या मखमली
जाळ्याला सांभाळत जा ग जरा…
बायको (लाजत) – तुम्ही पण ना…
इश्श…
नवरा – आई शप्पथ…
जर पुन्हा जेवणात तुझा केस सापडला ना,
तर साजणीवरून गजनी बनवून टाकेल तुला…
एक माणूस खड्डे बनवत होता; मागून दुसरा बुजवत येत होता…
एकाने असाच प्रश्न विचारला, तुम्ही हे काय करताय…??
तर ते म्हणाले, “हा सरकारी वृक्षारोपणाचा उपक्रम आहे..
मला खड्डे बनवण्याचे आणि याला बुजवण्याचे काम दिलेले आहे.
मध्ये झाड लावणारा आज रजेवर आहे.
आम्ही आमचे काम करत आहोत…
एकदा तरूण मुलांचा ग्रुप दिंडीला निघतो,
गूरूजी कानमंत्र सांगतात ?
रस्त्यात जर सुंदर मुलगी दिसली
तर फक्त हरि ओम ! म्हणायचं.
म्हणजे लक्ष विचलित होणार नाही.
थोडे अंतर चालल्यावर एक जन
!! हरि ओम !! म्हणतो..
लगेच बाकी सारे एका सूरात म्हणतात ?
कुठंय कुठंय !
Leave a Reply