![Best Marathi Ukhane for Female Best Marathi Ukhane for Female](https://jhakas.in/wp-content/uploads/2024/05/Best-Marathi-Ukhane-for-Female.jpg)
Best Marathi Ukhane for females| नवरी साठी मराठी उखाणे | वधूसाठी मराठी उखाणे | Marathi Ukhane for Bride | Marathi Ukhane For Marriage
Best Marathi Ukhane for females : तुम्ही मराठी उखाणे शोधत आहात का नवरीसाठी ? मग तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात इथे तुम्हाला लग्न असो या इतर समारंभ सर्वांसाठी उखाणे मिळतील ते पण फोटो सोबत. उखाणे घ्यायची ही महाराष्ट्रातील गमतीदार व मजेशीर परंपरा आहे आणि आपण ती जपली पहिजे .
मग वाचा महिलांसाठी मराठी उखाणे (Marathi Ukhane For Female), विनोदी उखाणे (Funny Marathi Ukhane), लग्नाचे उखाणे (Marathi Ukhane For Marriage), रोमँटिक मराठी उखाणे (Romantic Marathi Ukhane), सत्यनारायण पूजा उखाणे (Satyanarayan Pooja Ukhane), मकरसंक्रांती सणासाठी खास उखाणे (Makar Sankranti Ukhane In Marathi), वटपौर्णिमा उखाणे (Vat Purnima Ukhane) हळदीकुंकू उखाणे (Ukhane In Marathi For Haldi Kunku), बारश्यासाठी उखाणे (Marathi Ukhane For Baby Naming Ceremony).
उमराच्या झाडाखाली दत्ताची साउली
…रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.
रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा,
… रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.
यामिनीच्या अंगावर चांदण्याचा शेला
…रावांनी माझ्या हाती सौभाग्यकलश दिला.
मुलगा माझा कंठमणी, मुलगी माझी तन्मणी
…रावांच्या हृदयाची मी आहे स्वामिनी.
सर्व कार्याचा पाठीराखा विघ्नहर्ता गणेश
…राव आहेत आजपासून माझ्या जीवनाचे परमेश.
पूजिला गौरीहार दिला आशीर्वाद
…च्या प्रवेशते संसारात निर्विवाद.
आणखी माहिती वाचा :Birthday Wishes For Wife In Marathi | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
→ सप्तपदीच्या सात पावलांनी मार्ग आक्रमिते नवजीवनाचा
…च्या संसारात आशा करते आनंदाच्या.
→ वृक्षवेलींच्या सान्निध्यात देहभान हरपते,
…चे नाव घेऊन आशीर्वाद मागते.
→ मंगलदिनी दिला सर्वांनी प्रेमाचा आहेर,
…च्या करिता सोडते आज माहेर.
पैठणीवर शोभते, नाजूक मोरांची जोडी
…रावांमुळे आली, आयुष्याला गोडी
सोन्याची अंगठी, चांदीचे पैंजण,
…रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण
चांदीच्या वाटीत, सोन्याचा चमचा,
…रावांचे नाव घेते, आशिर्वाद तुमचा सर्वांचा
गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं
…रावांचे नाव, माझ्या मनात कोरलं
जेव्हा मी ह्यांना पाहते चोरून विचार करते मूक होऊन,
घडविले दैवांनी… रावांना जीव लावून
हृदयात दिले स्थान, तेव्हा दिला हातात हात,
… रावांच्या जीवनात लाविते प्रीतीची फुलवत
राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार,
… रावांनी घातला मला मंगळ सूत्राचा हार
पार्वती ने पण केला महादेवालाच वरीनं,
…रावांच्या साथीनं, आदर्श संसार करीन
चांदीचे जोडवे पतीची खूण,
.. रावांचे नांव घेते,… ची सून
तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेल ही शिंपडले,
…रावांचे मन, मी केव्हाच जिंकले
मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले,
… रावांचे हेच रूप मला फार आवडले
मला गुणवान पती मिळाले, याचा वाटतो प्रत्येकीला हेवा,
…राव माझ्या जीवनातील मौल्यवान ठेवा
शिक्षणाने विकसीत होते, संस्कारित जीवन,
…रावांच्या संसारात राखीन मी सर्वांचे मन
प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची,
…रावांच्या साथीने सुरवात करते सहजीवनाची
चंद्राचा झाला उदय अन् समुद्राला आली भरती,
…रावांच्या प्रेमाने सर्व दुःख हरती
नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार,
… रावांचा स्वभाव आहे फारच उदार
करवंदाची साल चंदनाचे खोड,
… रावांचे बोलणे अमृतापेक्षा गोड
सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,
…रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले
प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वात,
…रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात
शुभमंगल प्रसंगी अक्षता पडतात माथी,
आता ….राव माझे जीवनसाथी
मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर,
…रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर
Leave a Reply