
Good Morning Quotes Marathi | शुभ सकाळ मराठी संदेश | Good Morning Messages in Marathi | gm sms marathi | marathi sms good morning

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
Good Morning Messages in Marathi | good morning sms in marathi | good morning marathi quotes | good morning in marathi sms | good morning sms marathi | good morning marathi sms | gm sms marathi
आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक पद्धतीने व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते. आपण देखील सकाळी सकाळी अगदी प्रसन्न वातावरणात चांगल्या विचारांनी आपल्या दिवसाची सुरुवात करतो. त्यासाठी आपल्या जवळच्या। मित्रांना तसेच आपल्या नातेवाईकांना सोशल मीडिया वर शेयर करतो, तर मग मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Good Morning Messages in Marathi | शुभ सकाळ मराठी संदेश चा एक सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक केली आणि त्याच पद्धतीची उर्जा आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांनादेखील प्रदान केली तर त्यांच्याही दिवसाची सुरुवात प्रसन्न, सकारात्मक होईल.
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…
आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात
गणपती दर्शनाने करूया…शुभ सकाळ !
विश्वास ठेवा,
आपण जेव्हा कोणासाठी
काही चांगले करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,
कुठेतरी काही चांगले घडत असते…
शुभ सकाळ!
कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा..
ती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”…
शुभ सकाळ !
आणखी माहिती वाचा :Birthday Wishes For Wife In Marathi | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
“पहाटेची शांतता मनात नवीन स्वप्ने भरते,
आजचा दिवस तुमच्या सफलतेचा साक्षीदार व्हावो.”
“सूर्योदयाचा किरण तुमच्या चेहऱ्यावर हास्य उमटवो,
आनंदी आणि सकारात्मक विचारांनी तुमचा दिवस सजवो,
सुप्रभात म्हणून, नव्या आशेने जागा होवो,
तुमच्या यशाच्या गाथा सर्वांना प्रेरणा देवो.”
“आजची सकाळ नवीन उमेदींनी भरलेली असो,
तुमचे प्रत्येक क्षण सुखाचे आणि समाधानाचे असो.”
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
आणखी माहिती वाचा :Good Night Messages in Marathi | शुभ रात्री मराठी संदेश
दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ सकाळ
लहानपासुनच सवय आहे
जे आवडेल ते जपुन ठेवायचं..
मग ती वस्तु असो वा….
तुमच्यासारखी गोडं माणसं.
शुभ सकाळ!
धावपळीच्या या जीवनात कोण
कोणाची आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.
!! शुभ सकाळ !!
वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते,
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी
कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
सुप्रभात
आयुष्य खूप लहान आहे
प्रेमाने गोड बोलत रहा
धन-दौलत कोण कोणाला देत नसत
फक्त माणुसकी जपत रहा
प्रसंग कोणताही असो सुखाचा की दुःखाचा
तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन.
आयुष्य खूप सुंदर आहे,
उतुंग भरारी मारा,
ढगा आढ उडणाऱ्या गरूडाला
पण तुमचा हेवा वाटला पाहिजे
इतके मोठे व्हा, आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी आहेत
शुभ सकाळ
शिस्तीशिवाय जीवन म्हणजे
देवावीनं देऊळ
सुंदर दिवसाची पहाट,
सुंदर विचाराने
शुभ सकाळ
जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे
आपल्याजवळ असतात
तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत
शुभ सकाळ
“चिंता आणि नैराश्याचे काळोखाळ पळवून नेणारी,
सकाळची ही ताजी वारा तुम्हाला नवसंजीवनी देवो,
जीवनाच्या प्रत्येक आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद देवो,
आणि प्रत्येक अपयशातून नवीन शिकवण घेण्याची प्रेरणा देवो.”
“नवीन दिवसाच्या सुरुवातीला, तुमच्या मनात नवचैतन्य जागवो,
सुप्रभाताच्या या शुभेच्छा सोबत, नवीन स्वप्नांची उडाण घ्यावी.”
“सकाळच्या या ताज्या क्षणांमध्ये, आयुष्याच्या सर्व सुंदर गोष्टी साजर्या करूया,
आशा, आनंद आणि प्रेम यांच्या त्रिवेणीत, तुमचा प्रत्येक दिवस फुलू द्या.”
“या सकाळी, सूर्योदयाचे तेज तुमच्या जीवनात नव्या दिशा आणो,
स्वप्न पूर्ण करण्याची, आणि नव्याने सुरुवात करण्याची ऊर्जा देवो.”
कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही,
कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने
प्रत्येकालाच वेगळं बनवलयं प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं.
पाण्यापेक्षा “तहान” किती आहे याला जास्त किंमत असते.
मृत्यू पेक्षा “श्वासाला”जास्त किंमत असते,
या जगात नाते तर सर्वच जोडतात.
पण नात्यापेक्षा” विश्वासाला ” जास्त किंमत असते.
शुभ सकाळ
“माझ्यामुळे तुम्ही नाही ” तर “तुमच्यामुळे मी आहे”
ही वृत्ती ठेवा बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात
आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही.
शुभ सकाळ
स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,
कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे
कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच
स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे.
शुभ सकाळ
जिव्हाळायाचे ऋणानुबंध
असल्याशिवाय कोणी कोणाच्या
आयुष्यात येत नाही.
सुप्रभात
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजूक उन्हाची प्रेमळ साथ
मंजुळ वाऱ्याची हळूवार हालचाल
अशीच येवो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ – तुम्हा सर्वांना – शुभ सकाळ
रात्र ओसरली दिवस उजाडला
तुला पाहून सुर्यही चमकला
लखलखत्या किरणांनी झाडे लखाकली
तुझ्याशी गुजगोष्टी करण्यासाठी पहाट उगवली – शुभ सकाळ
प्रत्येक दिवसांत एक संधी दडलेली असते,
शुभ सकाळ त्याचीच होते ज्याला ती संधी साधता येते – शुभ सकाळ
निसर्ग आपल्याला देतो ते एक चेहरा
आणि आपण तयार करतो ती आपली ओळख – शुभ सकाळ
अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते
उन्हात फिरताना सावलीची गरज असते
जीवनात जगताना चांगल्या माणसांची गरज असते
माझ्या आयुष्यातील या चांगल्या माणसांना माझ्याकडून शुभ सकाळ
नवा दिवस नवी सुरूवात
नवी प्रेरणा आणि तुझी साथ
आयुष्य सुंदर आहे तुझा हात हातात आहे
परमेश्वराकडे मी यासाठी कृतज्ञ आहे – शुभ सकाळ
आपण जे देतो ते आपल्याकडे
परत येतं त्यामुळे चांगलं द्या,
चांगलच मिळेल.
शुभ सकाळ.
दिवा कधीच बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याच्या कामाचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विषयी काहीच बोलू नका
चांगले कर्म करत रहा
तेच तुमचा परिचय या दुनियेला देतील.
शुभ सकाळ
सोन्याचा साठा करुन मिळालेल्या
श्रीमंतीपेक्ष्या तुमच्या सारखा सोन्याहून
मुल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे ते खरे श्रीमंत…
शुभ सकाळ
मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध
हा येणारच, आणि आपली
माणसे किती लांब असली
तरी आठवण ही येणारच…
शुभ सकाळ
आवडतं मला त्या लोकांना
सकाळी गुड मॉर्निंग पाठवायला
जे माझ्या समोर नसून सुध्दा
माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे.
गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात…!
शुभ सकाळ !
कोणी कितीही घेरलं तरी
स्वतःचे अस्तित्व
स्वतः निर्माण करता यायला पाहिजे
शुभ सकाळ
सुंदर दिवसाची सुरुवात,
नाजुक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ.
शुभ सकाळ
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि
सूर्याच्या कोमल किरणांनी,
हि सकाळ आपल स्वागतं करत आहे
|| शुभ सकाळ ||
आयुष्य हे असच जगायचं असत आपल्याकडे
जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आहे
त्याचा सुयोग्य वापर करा जग अपोआप सुंदर बनत
|| शुभ सकाळ ||
स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला
दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही
अशा सामर्थ्यशाली व्यक्तीला हरवण्याचे धाडस
नियतीसुद्धा कधीच करत नाही – शुभ सकाळ
देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्यात समाधान माना
पण स्वतःवर विश्वास असेल तर देवालासुद्धा तुम्हाला जे हवे ते द्यायला भाग पाडा – शुभ सकाळ
नजरेत भरणारी माणसं जगात भरपूर असतील
पण ह्रदयात राहणारी माणसं क्वचितच भेटतात – शुभ सकाळ
खेळ शिकायचा असेल तर बुद्धीबळाचा शिका
कारण त्यात एक चांगला नियम आहे
आपली माणसं आपल्याच माणसांचा कधीच पराभव करत नाहीत – शुभ सकाळ
आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला हे ओळखता आले तर आयुष्यात प्रत्येक दिवस चांगलाच असणार – शुभ सकाळ
Leave a Reply