
लग्नासाठी खास निमंत्रण संदेश | Wedding Invitation Message In Marathi | लग्नाचे बेस्ट आमंत्रण संदेश | Best Wedding Invitation Ideas In Marathi

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
Wedding Invitation Message In Marathi : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खास क्षण असतो. अशा परिस्थितीत वधू-वरांप्रमाणेच त्यांचे कुटुंबीयही या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या मुलीचे लग्न भव्यदिव्य करण्यासाठी पालक आपला जीव धोक्यात घालतात. लग्नाची कुंडली पाहून लग्नाची तारीख आणि वेळ ठरवली जाते, सर्वप्रथम लग्नाची निमंत्रण पत्रिका तयार करावी लागते… भारतीय संस्कृतीत सर्वप्रथम देवाला म्हणजेच देवतेला निमंत्रण पत्रिका दिली जाते. नातेवाईक आणि मित्रांना आमंत्रित केले आहे. तुमचा विवाहसोहळा खास करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत हे खास लग्न निमंत्रण संदेश
साधुसंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवरायांच्या महाराष्ट्रात,
हिंदू संस्कृतीप्रमाणे मराठमोळ्या वातावरणात
हा विवाह सोहळा संपन्न होत आहे.
तरी आपण या सोहळ्यास उपस्थित राहून शोभा वाढवावी.
विवाह! एक बंधन, एक कर्तव्य, एक नवं नातं, एक जाणीव.
नव्याने जुळणारी एक रेशीम गाठ! एक स्वप्न… दोन डोळ्यांचं,
एक हुरहूर… दोन मनांची, एक चाहूल… सात जन्मांची,
अशा मंगल क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी
आपणांस विवाहाचे अगत्याचे आमंत्रण.
आणखी माहिती वाचा :Birthday Wishes For Wife In Marathi | पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश
अग्नी नारायणाच्या साक्षीने,
…. आणि … हे रेशमाच्या बंधनात, वाद्यांच्या गजरात,
सनईच्या सुरात, हळदी आणि मेंदीच्या रंगात जीवनसाथी होत आहेत.
अशा मंगल प्रसंगी आपले शुभार्शीवाद मिळावेत यासाठी
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
आपणांस आणि परिवारास आग्रहाचे आमंत्रण
नाती जन्मोजन्मींची, परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली…
लग्नाचे आग्रहाचे आमंत्रण
ब्रम्हसुतामध्ये बांधली गाठ प्रेमाच्या नात्याची,
पृथ्वी तलावर शोभे जोडी…. आणि ….. ची,
कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे.
आमच्या आनंद सोहळ्यातत आपण सर्वांनी उपस्थित राहून
वधू – वरांना शुभार्शीवाद आणि सदिच्छा द्याव्या ही विनंती
पहिला प्रहर एक क्षण, मेंदीचा बहर एक क्षण,
लगीन घाई एक क्षण, वाजे सनई एक क्षण,
अंतरपाठ एक क्षण, सर्व सोनेरी क्षणांचा हा जणू एक सण…
म्हणूनच आपणांस या सोनेरी क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अगत्याचे आमंत्रण
प्रथम पुजावा श्री गणपती । धन्य ती भारतीय संस्कृती ।
। ज्ञानेश्वराने चालवल्या भिंती । अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी ।
। सर्व काही ईश्वराच्या हाती । तोच जुळवितो नाती – गोती ।
। वधु-वरास आशिर्वाद द्यावेत हीच आमची नम्र विनंती ।।
श्री दत्त कृपेने व तुलजाईच्या आर्शिवादने
हा लग्नसोहका परिपूर्ण करण्याकारिता आपली उपस्थिति वंदनीय आहे,
बासाठी हे आमहाचे स्नेह निमंत्रण.
जन्म दिला पित्याने, गाठ मारली ब्रम्हदेवाने,
होईल आज विवाह अग्नीदेवाच्या साक्षीने,
शुभ कार्य सिद्धीस जाईल श्री गणेशाच्या आर्शीवादाने.
संसाराची सुरूवात होईल सप्तपदीने,
मंगलप्रसंगाची शोभा वाढू दे तुमच्या येण्याने
नवदाम्पत्याच्या सहजीवनाच्या नूतन पर्वाचा शुभारंभ होतोय,
कुलस्वामिनीच्या कृपेने, अग्नीदेवतेच्या साक्षीने,
श्री गणेशाच्या आर्शवादाने आणि त्यांच्या या वाटचालीत हवे आहात
आपले शुभार्शिवाद… आपणांस लग्नाचे आग्रहाचे निमंत्रण
लग्न इतक्या गडबडीत ठरलं आणि
लग्नाचा मुहूर्तही पण खूपच लवकर ठरला…
लग्नाची तयारी करायला खूप कमी वेळ मिळाला,
या गडबडीत तुमच्या पर्यंत लग्न पत्रिका येवो न येवो
माझे प्रेमाचे आणि आग्रहाचे निमंत्रण मात्र नक्कीच आहे…
लग्न म्हणजे एक पवित्र बंधन,
दोन नात्यांची सात जन्मांसाठी झालेली सुरेख गुंफण…
अशा मंगल सोहळ्यासाठी आपणांस आग्रहाचे निमंत्रण
विवाह हे दोन जीवांचे, दोन प्रेमाचे आणि दोन कुटुंबाचे मिलन आहे,
अशा या सुंदर मिलनाचे साक्षीदार होण्यासाठी आपणांस विवाहसोहळ्याचे आग्रहाचे आमंत्रण
लग्न म्हणजे रेशीमगाठ, अक्षता आणि मंगलाष्टकांची सात,
दोनाचे होणार आता चार हात, दोन जीव गुंतरणार एकमेकांत,
स्वप्न दोघांचे लग्नाचे, मंगलाष्टकांच्या सुरात पूर्ण होणार,
तुमच्या शुभार्शीवादाने नव्या संसाराची सुरवात होणार
विवाह म्हणजे आयुष्याच्या वेलीवरचे हळुवार पान,
दोन जीवांना जोडणारा एक नाजूक धागा, दोन कुटुंबांना जोडणारा एक स्नेहबंध,
सात जन्मांच्या गाठी जुळवणारा हा सोहळा, आपल्या शुभेच्छा आणि आर्शीवादा शिवाय अपूर्ण…
म्हणूनच आपणांस लग्नसोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण
नवदाम्पत्याच्या सहजीवनाच्या नूतन पर्वाचा शुभारंभ होतोय, कुलस्वामिनीच्या कृपेने,
अग्नीदेवतेच्या साक्षीने, श्री गणेशाच्या आर्शवादाने आणि त्यांच्या या वाटचालीत हवे आहात आपले शुभार्शिवाद…
आपणांस लग्नाचे आग्रहाचे निमंत्रण
ऋणानूबंध ठाऊक नव्हते.. एकमेकांना शोधत होते, नाते तसे जुनेच होते,
आगमन झाले शुभयोगाचे, नाते जुळले दोन मनांचे, असे हे बंध रेशमाचे, अथांग हा सागर संसाराचा,
विवाह होतोय…. आणि …. चा, आर्शीवाद असो मान्यवरांचा.
आपले पणाचे आमंत्रण आमचे आणि आपुलकीने आगमन तुमचे !!!
विवाह म्हणजे आजन्म साथ, आनंद आणि सुखाची बरसात,
…. आणि…. यांची जमली जोडी…. आपण येऊन त्यात घालावी आर्शीवादाची साथ
सप्तपदींची सात पावले म्हणजे सात जन्मांच्या गाठी,
यायलाच हवे तुम्हाला … आणि …. यांच्या विवाहासाठी,…
सागराला साथ लाटांची, सूर्याला साथ किरणांची,
पृथ्वीतलांवर जोडी शोभे …. आणि … ची, ईश्वरानेच गाठ बांधली सात जन्मांची,
पूर्व जन्मींची पुण्याई…. घराण्याची, सहपरिवार येऊन शोभा वाढवावी आपण मंगल कार्यांची…
पाऊस क्षणाचा पण गारवा कायमचा,
भेट क्षणाची पण मैत्री जन्माची, मुहूर्त क्षणाचा पण नाती कायमची,
आपला सहभाग क्षणाचा पण आर्शीवाज आयुष्यभराचा…
या मनस्वी इच्छेने शुभमंगल प्रसंगी अगत्य येऊन वधू वरांना आर्शावाद द्यावे.
Leave a Reply