
Vitthal Aarti in Marathi | विठ्ठल आरती | Vitthal Aarti with Lyrics in Marathi | युगे अठ्ठावीस विटेवरी उभा | येई हो विठ्ठले आरती

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
Vitthal Aarti in Marathi | आपल्या हिंदू धर्मात देवाची पूजा केली जाते. प्रत्येकाच्या घरी देवघर असते आणि रोज सकाळी देवाची पूजा करून आरती म्हटली जाते यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते. पंढरपूरचं विठ्ठल मंदिर प्रख्यात आहे
विठ्ठल म्हणजे संपुर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत, विठ्ठल, पांडुरंग, पंढरीनाथ, विठोबा, अशा अनेक नावानेही प्रसिद्ध आहेत. महाराष्टाच्या सोलापुर जिल्हयात पंढरपूर येथे प्रमुख मंदिर असून वारकरी संप्रदायाच्या अनुयायाचे प्रमुख तीर्थस्थान आहे.
तर मग मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Vitthal Aarti Marathi | विठ्ठल आरती चा एक सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत, मला आशा आहे तुम्हाला हे Vitthal Aarti Marathi | विठ्ठल आरती चा संग्रह नक्की आवडेल.
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा | विठ्ठल आरती
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा।
चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा।।1।।
जय देव जय देव जय पांडुरंगा।।
रखुमाईवल्लभा राहोच्या वल्लभा पावें जिवलगा ।।धृ.।।
जय देव
तुळसींमाळा गळां कर ठेवुनि कटीं।
कांसे पीतांबर कस्तुरि लल्लाटीं।
देव सुरवर नित्य येती भेटी।
गरुड हनुमंत पुढें उभे राहती ।।
जय देव ।।2।।
धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा।
सुवर्णाचीं कमळें वनमाळा गळां।
राई रखुमाई राणीया सकळा।
ओंवाळिती राजा विठोबा सांवळा ।।
जय देव ।।3।।
ओंवाळूं आरत्या कुर्वड्या येती ।
चंद्रभागेमाजीं सोडुनियां देती।
दिंड्या एताका वैष्णव नाचती।
पंढरीचा महिमा वर्णांवा किती ।।
जय देव ।।4।।
आषाढी कार्तिकी भक्तजन येती।
चंद्रभागेमध्यें स्नानें जें करिती।
दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती।
केशवासी नामदेव भावे ओंवाळिती।।
जय देव जय देव जय. ।।5।।
-संत नामदेव
श्री विठ्ठल आरती | Vitthal Aarti in Marathi
आरती अंतभुजा । विठो पंढरीराजा ।।
न चलती उपचार । मनें सारली पुजा ।।
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
परेस पार नाही न पडे निगमा ठायी ।।
भुलला भक्तिभावें । लाहो घेतला देहीं ।। आरती ।।
अनिर्वाच्या शुद्ध बुद्ध । उभा राहिला नीट ।।
रामाजनार्दनीं । पायी जोडली वीट । आरती ।।
हे हि वाचा :
येई हो विठ्ठले आरती | विठ्ठल आरती
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहें ॥ ध्रु० ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
आलिया गेलिया हातीं धाडी निरोप ।
पंढरपुरीं आहे माझा मायबाप ॥ १ ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
पिवळा पीतांबर कैसा गगनीं झळकला ।
गरुडावरि बैसोनि माझा कैवारी आला ॥ २ ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।
विष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी ॥ ३ ॥
येई हो विठ्ठले माझे माउली ये ।
-संत नामदेव
ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा | विठ्ठल आरती
ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा ।
राईरखुमाबाई सत्यभामेच्या वरा ।। धृ ।।
कनकाचे पर्येळी उजळोनी आरती ।
रत्नदीपशोभा कैशा प्रकाशल्या ज्योती ।। ओवाळूं || १ ||
मंडित चतुर्भुज कानीं शोभत कुंडले ।
श्रीमुखाची शोभा पाहतां तेज फांकले ।। ओवाळूं । २॥
वैजयंती माळ गळा शोभे स्यमंत ।
शङ्खचक्रगदापद्म आयुधें शोभत ।। ओवाळूं ।। ३ ॥
सांवळा सुंदर जैसा कर्दळीचा गाभा ।
चरणीईंचीं नूपुरें वांक्या गाजती नभा ।। ओवाळूं ।। ४ ।।
ओवाळीता मन माझें ठाकलें ठायी ।
समाधिस्थसमान तुकया लागला पायी ।। ओवाळूं ||५||
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा | विठ्ठल आरती
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्मा भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्मा ।। धृ।।
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म।। धृ।।*
अंबऋषी कारणे गर्भवास सोशीसी ।
वेद नेले चोरुनि ब्रह्मा आणुनिया देसी ।।
मत्स्यरुपीं नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।
हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ।। १ ।।
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्मा ।। धृ.।।
रसातळाशी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।
परोपकारासाठी देवा कांसव झालासी ।।
दाढें धरुनी पृथ्वी नेता वराहरुप होसी ।
प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरि गुरगुरसी ।। २ ।।
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्मा ।। धृ.।।
पांचवे अवतारी बळिच्या द्वाराला जासी ।
भिक्षे स्थळ मागुनी बळिला पाताळी नेसी ।।
सर्व समर्पण केले म्हणउनि प्रसन्न त्या होसी ।
वामनरूप धरूनी बळिच्याद्वारी तिष्ठसी ।। ३ ।।
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्मा ।। धृ.।।
सगस्त्रार्जुन मातला जमंदग्नीचा वध केला ।
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्रार्जुन वधिला ।।
नि:क्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।
सहावा अवतार परशुराम प्रगटला ।। ४ ।।
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्मा ।। धृ.।।
मातला रावण सर्वा उपद्रव केला ।
तेहतिस कोटी देव बंदी हरलें सीतेला ।।
पितृवचना लागीं रामें वनवास केला ।
मिळोनी वानर सहित राजाराम प्रगटला ।। ५ ।।
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्मा ।। धृ.।।
देवकी वसुदेव बंदी मोचन त्वां केलें ।
नंदाघरि जाऊन निजसुख गोकुळा दिधले ।।
गोरसचोरी करिता नवलक्ष गोपाळ मिळविले ।
गोपिकांचे प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ।। ६ ।।
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्मा ।। धृ.।।
बौद्ध कलंकी कवियुगी झाला अधर्म हा अवघा ।
सांडुनि नित्यधर्म सोडुनि नंदाची सेवा ।।
म्लेंच्छमर्दन करिसी म्हणुनी कलंकी केशवा ।
बहिरवि जान्हवि द्याचि निजसुखा नंदसेवा ।। ७ ।।
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्मा ।। धृ।।
घालीन लोटांगण
घालीन लोटांगण वंदिन चरन ।
डोळ्यांनी पाहीं रुप तुझे ।
प्रेम आलिंगिन आनंदे पूजीं ।
भावे ओवालीन म्हणे नामा ।
त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वम मम देव देव ।
कयें वच मनसेन्द्रियैवा ।
बुद्धयात्मना व प्रकृतिस्वभावा ।
करोमि यद्यत सकलं परस्मै ।
नारायणायेति समर्पयामि ॥०१॥
अच्युत केशवम रामनरायणं ।
कृष्णदामोदरं वासुदेवं हरी ।
श्रीधरम माधवं गोपिकावल्लभं ।
जानकीनायकं रामचंद्रम भजे ॥०२॥
हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०३॥
हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०४॥
हे हि वाचा :
Leave a Reply