
Vishnu aarti in Marathi | श्री विष्णु आरती | Vishnu aarti lyrics Marathi | Anantachi Aarti | व्यंकटेश आरती | सत्यनारायण आरती

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
Vishnu aarti in Marathi : श्री विष्णु आरती म्हणजे श्रीविष्णुच्या महिमेचा स्तवन करणारा गीत. त्यामुळे हा आरती सुमधुर, साधारण, आणि भक्तिपूर्ण आहे. ही आरती श्रीविष्णु भक्तांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि अनुभवांचा सारांश आहे. ज्याने हरी नामाचं उच्चार केलं, त्याला सर्व कष्ट, संकट, आणि दुःखांना हरवू शकतं. श्रीकृष्णा आरतीचं गाणं मनाला शांती आणि ध्यानात लावतं.
तर मग मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी vishnu aarti lyrics Marathi | श्री विष्णु आरती चा एक सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत, मला आशा आहे तुम्हाला हे vishnu aarti lyrics Marathi | श्री विष्णु आरती चा संग्रह नक्की आवडेल.
Anantachi aarti | श्री अनंताची आरती
जय श्रीअनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू।
भक्तां संकट पडतां धावे अनंत कनवाळू ।। धृ ।।
भाद्रपदमासी शुक्ल चतुर्दशी तव व्रत नेमाने ।
दुकूलदोरक करुनि पूजिति अनंत नामानें ।। १ ।।
नानापरिची पुष्पें द्रव्ये तुजला अर्पीती ।
षोडशपूजा करूनी द्वाह्मण संतर्पण करिती ॥ २॥
अपूप वायान दंपतिपूजन त्या दिवशी करिती ।
अनंत सन्तुष्टोनि देती संतति संपत्ती ।। ३।।
रामा धर्मे आचरीतां व्रत क्लेशांतुनि सुटला ।
कौडिण्याने पुजितां तुजला उद्धरिले त्याला ।। ४।।
मोरेश्वरसुत वासुदेव हा तिष्ठत सेवेसी ।
संकटकाळी रक्षी अनंता आपुल्या दासासी ॥ ५॥
Vishnu aarti | श्री विष्णु आरती
संत सनकादिक भक्त मिळाले अनेक ॥
स्वानंदे गर्जती पाहुं आले कौतुक ॥ १ ॥
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
नवल होताहे आरती देवाधिदेवा ॥
स्वर्गीहूनि सुरवर पाहुं येताति भावा ॥ धृ. ॥
नरनारी तटस्थ अवघे पडले नयना ॥
ओवाळितां श्रीमुख धनी न पुरे मना ॥ २ ॥
एका जनार्दनी मंगल कौतुकें गाती ॥
मंगल आरत्या गाती ।
मिळाले वैष्णव जयजयकारे गर्जती ॥ ३ ॥
Vyanketesh Aarti | व्यंकटेश आरती | जय व्यंकटेशा
शेषाचल अवतार तारक तूं देवा l
सुरवर मुनिवर भावें करिती जन सेवा ll
कमलारमणा अससी अगणित गुण ठेवा l
कमलाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ll १ ll
जय देव जय देव जय व्यंकटेशा l
केवळ करूणासिंधु पुरविसी आशा ll धृ. ll
हे निजवैकुंठ म्हणुनी ध्यातों मी तू तें l
दाखविसी गुण कैसे सकळिक लोकाते ll
देखुनि तुझे स्वरूप सुख अद्भुत होते l
ध्यातां तुजला श्रीपति दृढ मानस होते ll
हे हि वाचा :
Satayanarayan aarti | सत्यनारायण आरती
जय लक्ष्मी रमणा, स्वामी जय लक्ष्मी रमणा ।
सत्यनारायण स्वामी, जन पातक हरणा ॥
ॐ जय लक्ष्मी रमणा, स्वामी जय लक्ष्मी रमणा ।
रत्न जडि़त सिंहासन,अद्भुत छवि राजै ।
नारद करत निराजन, घण्टा ध्वनि बाजै ॥
ॐ जय लक्ष्मी रमणा, स्वामी जय लक्ष्मी रमणा ।
प्रकट भये कलि कारण, द्विज को दर्श दियो ।
बूढ़ा ब्राह्मण बनकर, कंचन महल कियो ॥
ॐ जय लक्ष्मी रमणा, स्वामी जय लक्ष्मी रमणा ।
दुर्बल भील कठारो, जिन पर कृपा करी ।
चन्द्रचूड़ एक राजा, तिनकी विपत्ति हरी ॥
ॐ जय लक्ष्मी रमणा, स्वामी जय लक्ष्मी रमणा ।
वैश्य मनोरथ पायो, श्रद्धा तज दीन्ही ।
सो फल भोग्यो प्रभुजी, फिर-स्तुति कीन्हीं ॥
ॐ जय लक्ष्मी रमणा, स्वामी जय लक्ष्मी रमणा ।
भाव भक्ति के कारण, छिन-छिन रूप धरयो ।
श्रद्धा धारण कीन्हीं, तिनको काज सरयो ॥
ॐ जय लक्ष्मी रमणा, स्वामी जय लक्ष्मी रमणा ।
ग्वाल-बाल संग राजा, वन में भक्ति करी ।
मनवांछित फल दीन्हों, दीनदयाल हरी ॥
ॐ जय लक्ष्मी रमणा, स्वामी जय लक्ष्मी रमणा ।
चढ़त प्रसाद सवायो, कदली फल, मेवा ।
धूप दीप तुलसी से, राजी सत्यदेवा ॥
ॐ जय लक्ष्मी रमणा, स्वामी जय लक्ष्मी रमणा ।
श्री सत्यनारायण जी की आरती, जो कोई नर गावै ।
ऋद्धि-सिद्ध सुख-संपत्ति, सहज रूप पावे ॥
जय लक्ष्मी रमणा, स्वामी जय लक्ष्मी रमणा ।
सत्यनारायण स्वामी, जन पातक हरणा ॥
घालीन लोटांगण
घालीन लोटांगण वंदिन चरन ।
डोळ्यांनी पाहीं रुप तुझे ।
प्रेम आलिंगिन आनंदे पूजीं ।
भावे ओवालीन म्हणे नामा ।
त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वम मम देव देव ।
कयें वच मनसेन्द्रियैवा ।
बुद्धयात्मना व प्रकृतिस्वभावा ।
करोमि यद्यत सकलं परस्मै ।
नारायणायेति समर्पयामि ॥०१॥
अच्युत केशवम रामनरायणं ।
कृष्णदामोदरं वासुदेवं हरी ।
श्रीधरम माधवं गोपिकावल्लभं ।
जानकीनायकं रामचंद्रम भजे ॥०२॥
हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०३॥
हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०४॥
हे हि वाचा :
Leave a Reply