शंकराची आरती | महादेवाची आरती | Shankarachi Aarti in Marathi | Shankarachi Aarti with Lyrics in Marathi | लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
Shankarachi Aarti in Marathi : आपल्या हिंदू धर्मात देवाची पूजा केली जाते. प्रत्येकाच्या घरी देवघर असते आणि रोज सकाळी देवाची पूजा करून आरती म्हटली जाते यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते. श्रावण महिन्याला खूप महत्व असून, सोमवार महादेवाचा असतो.
तर मग मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी शंकराची आरती | महादेवाची आरती | Shankarachi Aarti in Marathi चा एक सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत, मला आशा आहे तुम्हाला हे शंकराची आरती | महादेवाची आरती | Shankarachi Aarti in Marathi चा संग्रह नक्की आवडेल.
श्री शंकर आरती | लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव ॥ २ ॥
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव ॥ ३ ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव ॥ ४ ॥
– समर्थ रामदास स्वामी
Jay dev Mangesha | जय देव जय देव श्रीमंगेशा
जय देव जय देव श्रीमंगेशा ।
पंचारती ओवाळु सदया सर्वेशा ।। धृ ।।
सदया सगुणा शंभो अजिनांम्बधारी ।
गौरीरमणा आद्या मदनांतकारी ।।
त्रिपुरारी अधहारी शिवमस्तकधारी ।
विश्वंभर विरुदे हें नम संकट धारि ।। जय ।।
भयकृत भयनाशक ही नामे तुज देवा ।
विबुधादिक कमळासन वांछित तव सेवा ।।
तुझे गुण वर्णाया वाटतसे हेवा ।।
अभिनव कृपाकटाक्षे मतिउत्साव द्यावा ।। जय ।।
शिव शिव जपता शिव तु करिसी निजदासा ।
संकट वारी मम तु करी शत्रुविनाशा।
कुलवृद्धीते पाववी हीच असें आशा ।
अनंतसुत वांछितसे चरणबुजलेशा ।। जय ।।
हे हि वाचा :
Jay Jay Triyambakraj | जय जय त्र्यंबकराज
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो ॥
त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा शशिशेखरा हो ॥
वृषभारूढ फणिभुषण दशभुज पंचानन शंकरा हो ॥
विभूतिमाला जटा सुंदर गजचर्मांबरधरा हो ॥ ध्रु ॥
पडलें गोहत्येचें पातक गौतमऋषिच्या शिरीं हो ॥
त्यानें तप मांडिलें ध्याना आणुनि तुज अंतरीं हो ॥
प्रसन्न होउनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो ॥
औदुंबरमुळिं प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ॥ जय ॥ १ ॥
धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णूं किती हो ।
आणिकही बहु तीर्थें गंगाद्वारादिक पर्वतीं हो ॥
वंदन मार्जन करिती त्यांचे महादोष नासती हो ॥
तुझिया दर्शनमात्रें प्राणी मुक्तीतें पावती हो ॥ जय ॥ २ ॥
ब्रह्मगिरीची भावें ज्याला प्रदक्षिणा जरि घडे हो ॥
तैं तैं काया कष्टे जंव जंव चरणीं रुपती खडे हो ॥
तंव तंव पुण्य विशेष किल्मिष अवघें त्यांचें झडे हो ॥
केवळ तो शिवरूप काळ त्याच्या पायां पडे हो ॥ जय ॥ ३ ॥
लावुनियां निजभजनीं सकळहि पुरविसि मनकामना हो ॥
संतति संपति देसी अंतीं चुकविसि यमयातना हो ॥
शिव शिव नाम जपतां वाटे आनंद माझ्या मना हो ॥
गोसावीनंदन विसरे संसारयातना हो ॥ जय जय० ॥ ४ ॥
जय शिव ओंकारा | श्री शंकर आरती
जय शिव ओंकारा ॐ जय शिव ओंकारा ।
ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्द्धांगी धारा ॥ ॐ जय शिव…॥
एकानन चतुरानन पंचानन राजे ।
हंसानन गरुड़ासन वृषवाहन साजे ॥ ॐ जय शिव…॥
दो भुज चार चतुर्भुज दस भुज अति सोहे।
त्रिगुण रूपनिरखता त्रिभुवन जन मोहे ॥ ॐ जय शिव…॥
अक्षमाला बनमाला रुण्डमाला धारी ।
चंदन मृगमद सोहै भाले शशिधारी ॥ ॐ जय शिव…॥
श्वेताम्बर पीताम्बर बाघम्बर अंगे ।
सनकादिक गरुणादिक भूतादिक संगे ॥ ॐ जय शिव…॥
कर के मध्य कमंडलु चक्र त्रिशूल धर्ता ।
जगकर्ता जगभर्ता जगसंहारकर्ता ॥ ॐ जय शिव…॥
ब्रह्मा विष्णु सदाशिव जानत अविवेका ।
प्रणवाक्षर मध्ये ये तीनों एका ॥ ॐ जय शिव…॥
काशी में विश्वनाथ विराजत नन्दी ब्रह्मचारी ।
नित उठि भोग लगावत महिमा अति भारी ॥ ॐ जय शिव…॥
त्रिगुण शिवजीकी आरती जो कोई नर गावे ।
कहत शिवानन्द स्वामी मनवांछित फल पावे ॥ ॐ जय शिव…॥
जय शिव ओंकारा हर ॐ शिव ओंकारा|
ब्रह्मा विष्णु सदाशिव अद्धांगी धारा॥ ॐ जय शिव ओंकारा…॥
घालीन लोटांगण
घालीन लोटांगण वंदिन चरन ।
डोळ्यांनी पाहीं रुप तुझे ।
प्रेम आलिंगिन आनंदे पूजीं ।
भावे ओवालीन म्हणे नामा ।
त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वम मम देव देव ।
कयें वच मनसेन्द्रियैवा ।
बुद्धयात्मना व प्रकृतिस्वभावा ।
करोमि यद्यत सकलं परस्मै ।
नारायणायेति समर्पयामि ॥०१॥
अच्युत केशवम रामनरायणं ।
कृष्णदामोदरं वासुदेवं हरी ।
श्रीधरम माधवं गोपिकावल्लभं ।
जानकीनायकं रामचंद्रम भजे ॥०२॥
हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०३॥
हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०४॥
हे हि वाचा :
Leave a Reply