Marathi jokes for Whatsapp | व्हॉटसअपसाठी मजेशीर जोक्स

Marathi jokes for WhatsApp

Marathi jokes for Whatsapp | व्हॉटसअपसाठी मजेशीर जोक्स | WhatsApp Sms Marathi Jokes | Funny Messages in Marathi | व्हॉट्सअपसाठी बेस्ट मराठी जोक्स

Marathi jokes for WhatsApp
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Marathi jokes for Whatsapp : आपण रोजच्या आयुष्यात इतके धकाधकीचे आयुष्य जगत असतो आणि इतके तणावात असतो की आपल्याला रोजच्या जगण्यात थोडं हसू गरजेचे असते.  हसल्याशिवाय दिवस म्हणजे अगदी कंटाळवाणा. अनेक भन्नाट मराठी जोक्स अर्थात मीम्सही हल्ली सोशल मीडियावर  असतात जे आपल्याला हसवतात. जागतिक हास्य दिन असल्याने आपण असेच काही मराठी विनोदी जोक्स Marathi jokes for Whatsapp या लेखातून बघणार आहोत.

तर मग मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Marathi jokes for Whatsapp | व्हॉटसअपसाठी मजेशीर जोक्स चा एक सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत, मला आशा आहे तुम्हाला हे Marathi jokes for Whatsapp | व्हॉटसअपसाठी मजेशीर जोक्स चा संग्रह नक्की आवडेल.

Marathi jokes for WhatsApp

नवरा तिच्या गरोदर बायकोला दवाखान्यात घेऊन जातो.
तेवढ्यात एक माणूस विचारतो – तुमची बायको आहे काय?
नवरा – हो…!
माणूस – प्रेग्नंट आहेत काय?
नवरा (चिडून) – नाही नाही…
कोण म्हणाले…! तिने तर फुटबॉल गिळलाय…!


Marathi jokes for WhatsApp

देव – मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय पाहिजे…?
गण्या – पैशांनी भरलेली Bag, नोकरी आणि
एक मोठ्ठी गाडी ज्यामध्ये खूप सुंदर मुली असतील.
देव – तथास्तु
(गण्या आता कंडक्टर आहे)


Marathi jokes for WhatsApp

पोलीस – काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री…?
बंड्या – प्रवचन ऐकायला…
पोलीस – कोणत्या विषयावर प्रवचन आहे…?
बंड्या – दारूपासून होणारे दुष्परिणाम
पोलीस – एवढ्या रात्री कोण देत प्रवचन…?
बंड्या – माझी बायको…


आणखी वाचा :


Marathi jokes for WhatsApp

एक माणूस खड्डे बनवत होता; मागून दुसरा बुजवत येत होता…
एकाने असाच प्रश्न विचारला, तुम्ही हे काय करताय…??
तर ते म्हणाले, “हा सरकारी वृक्षारोपणाचा उपक्रम आहे..
मला खड्डे बनवण्याचे आणि याला बुजवण्याचे काम दिलेले आहे.
मध्ये झाड लावणारा आज रजेवर आहे.
आम्ही आमचे काम करत आहोत….


Marathi jokes for WhatsApp

डॉक्टर – घाबरू नका देशपांडे… खूप छोटं ऑपरेशन आहे.

पेशंट – थॅंक यु डॉक्टर, पण माझं नाव देशपांडे नाही.

डॉक्टर – माहीत आहे… देशपांडे माझं नाव आहे

रमेश – जर मी या नारळाच्या झाडावर चढलो तर मला इंजिनिअरींगच्या मुली दिसतील का ?

सुरेश – हो नक्की. पण हात सुटला तर मेडिकल कॉलेजच्या पण दिसतील.


नवरी जेवताना – अगं तुझं नेट बंद आहे का ?

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बायको – नाही सुरू आहे काय झालं

नवरा – अगं मला भाजी वाढ म्हणून मी कधीचा मेसेज टाकलाय, पण अजून वाढली नाहीस. म्हणून विचारलं


Marathi jokes for WhatsApp

पूर्वी दोघांचे भांडण सुरु झाले तर
तिसरा सोडवायला जायचा…
आता
.
.
तिसरा त्या भांडणाचा व्हिडिओ बनवतो.


यजमान – आम्ही दार्जीलिंगचा चहा वापरतो
पुणेकर – वा , तरीच छान थंड होता. . .
किमान शब्दात कमाल अपमान…


दोन मित्र फोनवर बोलत असतात.
पहिला – Hello भाई काय करतोस…?
दुसरा – मस्त रे एकदम, काय म्हणतोस…?
पहिला – अरे एक काम होते.
दुसरा – हा कर मग,
थोड्या वेळाने निवांत बोलू.


Marathi jokes for WhatsApp

काही लोकं आपलं मूड ऑफ झाला की DP काढून टाकतात
असा कसा यांचा मुड
जो स्वतःचा थोबाडही बघवत नाय


एक माणूस फिक्स्ड डिपॉजिट करण्यासाठी बँकेत जातो आणि विचारतो…
माणूस : सर मला बँकेत फिक्स्ड डिपॉजिट करायचे आहेत.
क्लर्क : सॉरी सर! ती स्कीम आता बंद झाली आहे.
ग्राहक (रागात येऊन ) : अस कस नाहीये ! मग भिंतीवर त्या पाटीवर कशाला लावलं आहे?
क्लर्क (शांतपणे) : भिंतीवर गांधीजी पण आहेत. आहेत का ते आता?


यजमान : आम्ही दार्जीलिंगचा चहा वापरतो
पुणेकर : वा , तरीच छान थंड होता. . .
किमान शब्दात कमाल अपमान


आणखी वाचा :


नॉर्मल माणूस वडापाव खातो, मग तोच आजारी पडला की हॉस्पिटलमध्ये बसून अॅपल खातो.

त्याला बघायला आलेले नातेवाईक हॉस्पिटल बाहेर उभं राहून वडापाव खातात.


Marathi jokes for WhatsApp

डॉक्टर – तुझे तीन दात कसे तुटले

पेशंट – बायकोने दगडासारखी भाकरी केली होती.

डॉक्टर  – मग खायला नकार द्यायचा ना

पेशंट – तोच तर केला


.नवरा – माझ्या छातीत दुखतंय, डॉक्टरांना फोन लाव

बायको – आता करते, तुमच्या फोनचा पासवर्ड द्या

नवरा – राहू दे, आता जरा बरं वाटतंय मला.


सकाळी बायको जेवणात मीठ टाकायला विसरली …
अन मी दिवसभर टेंशन मध्ये ना भो…
तोंडाची चव गेली की काय? हा विचार करून करून


इथं घराबाहेर सुद्धा जाता येत नाही ,
आणि पेपरमध्ये आजचे राशिभविष्य आलंय ,
प्रवासाचा योग आहे..
अँबुलन्स येते कि काय.


एक मुलगा गाढवाच्या पायाजवळ घसरून पडतो. तेव्हा बाजूने जाणारी एक मुलगी त्याला विचारते…

मुलगी – काय रे भावाच्या पाया पडतोयस का ?

मुलगा – होय वहिनी!


हात त्याचाच पकडा जो हात तुमचा कधीच मरेपर्यंत सोडणार नाही…
उदा :-
विजेची तार…


भांडण केल्यावर कधी आठवलं का कि…
अरे यारं आपण हा पॉईंट तर बोललोच नही…


पूर्वी मी खूप कष्टाळू होतो.
आता
कष्ट टाळू झालोय…


बायको – नेहमी माझं अर्ध डोक दुखत राहते.
वाटतंय डॉक्टरला दाखवायला हवं…
नवरा – अरे त्यात काय दाखवायचं…!
जितकं आहे तितकंच दुखणार ना…!
बस्स…! तेव्हापासून नवऱ्याचे संपूर्ण अंग दुखत आहे.


तीन उंदीर गप्पा मारत असतात.
पहिला – मी विषारी गोळ्या आरामात चघळतो.
दुसरा – मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो.
तिसरा लगेच उठतो आणि जायला लागतो,
पहिला आणि दुसरा विचारतात,
काय झालं कुठ चालला…?
तिसरा – आलोच, मांजरीचा कीस घेऊन…


2 चा पाढा एका कागदावर लिहून
तो जाळल्यास जी राख तयार होते
तिला ‘बेचिराख’ म्हणतात!
शपथ काय काय सुचायला लागलय बसल्या बसल्या !


भक्त – देवा,
मी पापी आहे.
मला दुःख द्या.
दर्द द्या. मला बरबाद करून टाका.
माझ्यामागे भूत सोडा…
देव – नाटक का करतोयस…!
सरळ सरळ सांग ना, तुला बायको पाहिजे.


एक भिकारी देवाला म्हणतो…
हे देवा मला खाण्यासाठी असं काहीतरी दे जे,
खाल्ल्यावरसुद्धा संपले नाही पाहिजे…
देव – हे घे पूर्ण एक चिंगम…


नवरा – माझ्या छातीत खूप दुखायला लागलंय…
ताबडतोब अँब्युलंसला फोन लाव…
बायको – हो लावते, तुमच्या मोबाईलचा
पासवर्ड सांगा बर…!
नवरा – राहू दे, थोडं बर वाटतंय आता…!


डॉक्टर – बाई, तुमच्या नवऱ्याच्या सगळ्या टेस्ट झाल्यात
आणि
सगळेच रिपोर्ट नॉर्मल आले आहेत…
काही कळतच नाहीये,
यांना नेमकं काय झालंय ते…?
बाई (काळजीच्या सुरात) – अहो डॉक्टर साहेब, ते
पोस्ट मार्टम का काय असत, ते तरी करून पहा एकदा…!!!
(पेशंट फरार आहे…)


माझे काही मित्र एवढे रिकामटेकडे आहेत
कि, बसल्या बसल्या
मुंग्यांचा रस्ता अडवून बोलतात…
आता कुठून जातेस बघतोच…!!!


काल एकाला उधारी मागण्यासाठी
घरच्या लँडलाईन वर फोन केला,
तर तो म्हणतो,
“अरे यार, थोडा वेळाने फोन कर…
मी आता गाडी चालवतोय…..”


एका लग्नाच्या कार्यालयात एका माणसाला
मुलीकडचे विचारतात, “तुम्ही वर पिता का ?”
उत्तर – तसं काही नाही.
खाली व्यवस्था केली असेल तरीही चालेल…


बायको तिच्या मैत्रिणीला – अग काल दिवसभर नेट चालत नव्हते…
मैत्रीण – मग काय केले…?
बायको – काही नाही ग, नवऱ्याबरोबर गप्पा मारत होते.
चांगला वाटला ग स्वभावाने…


आणखी वाचा :


बायको – तुम्ही काल खूप प्यायला होता.
नवरा – नाही गं.
बायको – तुम्ही नळापाशी बसून म्हणत होता,
रडू नको सगळं ठीक होईल…


नवरा – साजणी, तुझ्या केसांच्या मखमली
जाळ्याला सांभाळत जा ग जरा…
बायको (लाजत) – तुम्ही पण ना…
इश्श…
नवरा – आई शप्पथ…
जर पुन्हा जेवणात तुझा केस सापडला ना,
तर साजणीवरून गजनी बनवून टाकेल तुला…


एक माणूस खड्डे बनवत होता; मागून दुसरा बुजवत येत होता…
एकाने असाच प्रश्न विचारला, तुम्ही हे काय करताय…??
तर ते म्हणाले, “हा सरकारी वृक्षारोपणाचा उपक्रम आहे..
मला खड्डे बनवण्याचे आणि याला बुजवण्याचे काम दिलेले आहे.
मध्ये झाड लावणारा आज रजेवर आहे.
आम्ही आमचे काम करत आहोत…


माणूस – साहेब माझी बायको हरवलीय ….
हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे,
पोलिस स्टेशन नाही…
तक्रार द्यायला पोलीस स्टेशन मध्ये जा ….
माणूस – च्यायला, आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच कळत नाही…


नवरा – जर मी नेता झालो ना,
तर आख्या देशाला बदलून टाकील…
बायको – जरा कमी पेत जा…
लुंगी समजून माझी साडी नेसली तुम्ही…
ती बदला आधी…!!!


20 – 25 तत्ववेत्ते हिमालयात जात होते…
एक न्यूज रिपोर्टर – तुम्ही सर्व लोक कुठे चालला आहात…?
तत्ववेत्ते – हिमालयात, समाधी घ्यायला…
न्यूज रिपोर्टर – पण का…?
असं काय घडलंय…!
तत्ववेत्ते – जेव्हापासून Whatsapp आलंय,
तेव्हापासून मोठ-मोठे ज्ञानी, तत्ववेत्ते पैदा होऊन राहिलेत,
आता संसाराला आमची काही गरज नाहीये…!


डॉक्टर (संताला) – सांगण्यास वाईट वाटतंय कि,
तुमची एक किडनी फेल झाली आहे…!
हे ऐकल्यावर संता खूप रडतो…
मग तो शांत होऊन डॉक्टरला विचारतो…
किती गुणांनी…?


आणखी वाचा :

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*