Krishna Aarti in Marathi | श्री कृष्णाची आरती | Krishna Aarti with Lyrics in Marathi | हरि चला मंदिरा ऐशा | श्रीकृष्णाचा विडा
Krishna Aarti in Marathi | श्रीकृष्णा आरती म्हणजे श्रीकृष्णाच्या महिमेचा स्तवन करणारा गीत. त्यामुळे हा आरती सुमधुर, साधारण, आणि भक्तिपूर्ण आहे. ही आरती श्रीकृष्ण भक्तांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि अनुभवांचा सारांश आहे. ज्याने हरी नामाचं उच्चार केलं, त्याला सर्व कष्ट, संकट, आणि दुःखांना हरवू शकतं. श्रीकृष्णा आरतीचं गाणं मनाला शांती आणि ध्यानात लावतं.
तर मग मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी Krishna Aarti in Marathi | श्री कृष्णाची आरती चा एक सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत, मला आशा आहे तुम्हाला हे Krishna Aarti in Marathi | श्री कृष्णाची आरती चा संग्रह नक्की आवडेल.
हरि चला मंदिरा ऐशा | कृष्ण आरती मराठी
हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका म्हणती राधिका।
भावें ओवाळिती यदुकुलतिलका ।।धृ।।
एकीकडे राई एकीकडे रखुमाई।
भावे ओवाळिता हरिसी तूं होसी दो ठाईं।।हरि।।1।।
अष्टाधिक सोळा सहस्त्र ज्याच्या सुंदरा ज्याच्या सुंदरा।
जिणे जिणें प्रार्थिलें जासी तियेच्या घरा।।हरि।।2।।
एका जनार्दनी हरी तूं लाघवी होसी।
इतक्याही भोगुनी ब्रह्मचारी म्हणवीसी ।।हरि।।3।।
ऐकोनी कृष्णकीर्ती | कृष्ण आरती मराठी
ऐकोनी कृष्णकीर्ती मन तेथें वेधलें।
सगुणरुप माये माझ्या जीवीं बैसलें।
तें मज आवडतें अनुमान न बोले।
पाहावया रूप याचें उतावीळ हो झालें।।1।।
यालागीं आरती हो कृष्णा पाही हो सखी।
आणिक नावडे हो दुजे तिहीं हो लोकीं ।।धृ।।
पाऊल कृष्णजीचें माझ्या जीवीं बैसलें।
सनकादिक पाहा महा आसक्त झाले।
मुक्त जो शुकमुनी तेणें मनीं धरिलें।
तें मी केवीं सोडूं मज बहू रुचलें।।2।।
निर्गुण गोष्टी माये मज नावडे साचें।
सगुण बोल कांही केव्हां आठवी वाचें।
पाया लागेन तुझ्या हेंचि आर्त मनींचें।
तेणें घडेल दास्य रमावल्लभाचें।।3।।
अवतार गोकुळी हो | श्री कृष्णाची आरती
अवतार गोकुळी हो। जन तारावयासी।
लावण्यरुपडे हो। तेज:पुंजाळ राशी।
उगवले कोटिबिंब। रवि लोपला शशी।
उत्साह सुरवरां। महाथोर मानसी।।1।।
जय देवा कृष्णनाथा। राईरखुमाई कांता।
आरती ओवाळीन। तुम्हा देवकीसुता ।।धृ।।
कौतुक पहावया। भाव ब्रह्मयाने केली।
वत्सेही चोरूनिया। सत्यलोकासी नेलीं।
गोपाल गाईवत्सें। दोन्ही ठाई रक्षिली।
सुखाचा प्रेमसिंधु। अनाथांची माऊली।।2।।
चोरितां गोधनें हो। इन्द्र कोपला भारी।
मेघ कडाडिला। शिला वर्षलल्या धारी।
रक्षिले गोकुळ हो। नखीं धरिला गिरी।
निर्भय लोकपाळ। अवतरला हरी।।3।।
वसुदेव देवकीचे। बंद फोडिली शाळ।
होऊनिया विश्वजनिता। तया पोटिंचा बाल।
दैत्य हे त्रासियेले। समुळ कंसासी काळ।
राज्य हें उग्रसेना। केला मथुरापाळ।।4।।
तारिले भक्तजन। दैत्य सर्व निर्दाळून।
पांडवा साहाकारी। अडलिया निर्वाणी।
गुण मी काय वर्णु। मति केवढी वानूं।
विनवितो दास तुका। ठाव मागे चरणी।।5।।
हे हि वाचा :
कृष्णाची आरती मराठी – shrikrishna aarti
सहस्त्रदीपें दीप कैसी प्रकाशली प्रभा।
उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा।।1।।
कांकड आरती माझ्या कृष्ण सभागिया।
चराचर मोहरलें तुझी मूर्ती पहाया।।धृ।।
कोंदलेंसे तेज प्रभा झालीसे एक।
नित्य नवा आनंद ओंवाळितां श्रीमुख।।2।।
आरती करितां तेज प्रकाशलें नयनीं।
तेणें तेजें मीनला एका एकीं जनार्दनीं।।3।।
श्रीकृष्णाचा विडा | कृष्णाची आरती मराठी
विडा घ्या हो नारायणा । कृष्ण जगत्रयजीवना ।
विनविते रखुमाबाई । दासी होईल मी कान्हा ।। विडा ० ।। धृ ०।।
शांती हे नागवेली । पानें घेऊनिया करीं ।
मीपण जाळुनिया । चुना लावियेला वरी ।। विडा ० ।। १ ।।
वासना फेडुनिया । चूर्णाकेली सुपारी ।
भावार्थ कापूराने । घोळीयेली निर्धारी ।। विडा ० ।। २ ।।
विवेक हा कातरंग । रंगी रंगला सुरंग ।
वैराग्य जायफळ । मेळविले अभंग ।। विडा ० ।। ३ ।।
दया हे जायपत्री । क्षमा लवंगा आणिल्या ।
सुबुद्धी वेलदोडे । शिवरामें अर्पिलेये ।। विडा ० ।। ४ ।।
घालीन लोटांगण
घालीन लोटांगण वंदिन चरन ।
डोळ्यांनी पाहीं रुप तुझे ।
प्रेम आलिंगिन आनंदे पूजीं ।
भावे ओवालीन म्हणे नामा ।
त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वम मम देव देव ।
कयें वच मनसेन्द्रियैवा ।
बुद्धयात्मना व प्रकृतिस्वभावा ।
करोमि यद्यत सकलं परस्मै ।
नारायणायेति समर्पयामि ॥०१॥
अच्युत केशवम रामनरायणं ।
कृष्णदामोदरं वासुदेवं हरी ।
श्रीधरम माधवं गोपिकावल्लभं ।
जानकीनायकं रामचंद्रम भजे ॥०२॥
हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०३॥
हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०४॥
हे हि वाचा :
Leave a Reply