
Devichi aarti in Marathi | देवीची आरती | Devichi aarti lyrics marathi | Durga Devi Aarti | Mahalakshmi Aarti | Amba aarti

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
Devichi aarti in Marathi : देवीची आरती दिवसातून दोनदा प्रथम सकाळी सूर्योदयापूर्वी आणि दुसरी वेळ सूर्यास्तानंतर संध्याकाळी केली जाते. आपल्या हिंदू धर्मात देवाची पूजा केली जाते. प्रत्येकाच्या घरी देवघर असते आणि रोज सकाळी देवाची पूजा करून आरती म्हटली जाते यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते. नवरात्रीत नवदुर्गांची पूजा केली जाते. वाचा देवीची आरती.
तर मग मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्ही तुमच्यासाठी देवीची आरती | devichi aarti lyrics marathi चा एक सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहोत, मला आशा आहे तुम्हाला हे देवीची आरती | devichi aarti lyrics marathi चा संग्रह नक्की आवडेल.
Durga Devi Aarti | श्री दुर्गा देवीची आरती
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी।
अनाथ नाथे अम्बे करुणा विस्तारी।
वारी वारी जन्म मरणांते वारी।
हारी पडलो आता संकट निवारी॥
जय देवी जय देवी महिषासुर मथिनी।
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥
त्रिभुवन-भुवनी पाहता तुज ऐसी नाही।
चारी श्रमले परन्तु न बोलवे काही।
साही विवाद करिता पडले प्रवाही।
ते तू भक्तालागी पावसि लवलाही॥
जय देवी जय देवी महिषासुर मथिनी।
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा।
क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशा।
अम्बे तुजवाचून कोण पुरविल आशा।
नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा॥
जय देवी जय देवी महिषासुर मथिनी।
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥
हे हि वाचा :
श्री महालक्ष्मीची आरती | Mahalakshmi Aarti
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता।
पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
जय देवी जय देवी…॥
मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।
शशिकरवदना राजस मदनाची जननी॥
जय देवी जय देवी…॥
तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।
गायत्री निजबीजा निगमागम सारी।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥
जय देवी जय देवी…॥
अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं।
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं।
वारी मायापटल प्रणमत परिवारी।
हें रुप चिद्रूप दावी निर्धारी॥
जय देवी जय देवी…॥
चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी।
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी।
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी॥
जय देवी जय देवी…॥
Amba aarti | अंबा आरती
सुखसदने शशिवदने अंबे मृगनयने ।
गजगमने सुरनमने कोल्हापुरमथने ॥
सुरवर वर्षति सुमनें करुनियां नमनें ।
भयहरणे सुखकरणे सुंदरी शिवरमणे ॥ १ ॥
जय देवी जय देवी वो जय अंबे ।
कोल्हापुराधिस्वामिणि तुज वो जगदंबे ॥धृ. ॥
मृगमदमिश्रित केशर शोभत तें भाळीं ।
कुंचित केश विराजित मुगुटांतून भाळीं ।
रत्नजडित सुंदर अंगी कांचोळी ।
चिद्गगनाचा गाभा अंबा वेल्हाळी ॥ जय. ॥ २ ॥
कंठी विलसत सगुण मुक्ता सुविशेषें ।
पीतांबर सुंदर कसियेला कांसे ।
कटितटि कांची किंकिणि ध्वनि मंजुळ भासे ।
पदकमळलावण्यें अंबा शोभतसे ॥ जय. ॥ ३ ॥
झळझळ झळझळ झळकति तानवडें कर्णी ।
तेजा लोपुनि गेले रविशशि निज करणीं ।
ब्रह्महरिहर सकळिक नेणति तव करणी ।
अद्भुत लीला लिहितां न पुरे ही धरणी ॥ जय. ॥ ४ ॥
अष्टहि भूजा सुंदर शोभतसे शोभे ।
झगझग झगझग झगति लावण्यगाभा ।
म्हगम्हग म्हगम्हग म्हगीत समनांची शोभा ।
त्र्यंबक मधुकर होउनि वर्णितसे अंबा ॥ ५ ॥
Mahalaxmi Aarti | श्री महालक्ष्मीची आरती
जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता ।
प्रसन्न होऊनिया वर देई आता ।। धृ ।।
विष्णुप्रिये तुझी सर्वांतरी सत्ता ।
धन दौलत देई लक्ष्मीव्रत करिता ।।१।।
विश्वव्यापक जननी तुज ऐसी नाही ।
धावसी आम्हालागी पावसी लवलाही ।।२।।
त्रैलोक्य धारिणी तु भक्ता लाभे सुखशांती ।
सर्व सर्वही दुःख सर्व ती पळती ।।३।।
वैभव ऐश्वर्याचे तसेच द्रव्याचे ।
देसी दान वरदे सदैव सौख्याचे ।।४।।
यास्तव अगस्ती बन्धु आरती ओवाळी ।
प्रेमे भक्तासवे लोटांगण घाली ।।५।।
Santoshi Maata Aarti | श्री देवी संतोषी आरती
जय देवी श्री देवी संतोषी माते।
वंदन भावे माझे तव पदकमलाते।।धृ।।
श्रीलक्ष्मीदेवी तूं श्रीविष्णूपत्नी। पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नी।।
जननी विश्वाची तू जीवन चिच्छक्ती। शरण तुला मी आलो नुरवी आपत्ती।।१।।
गुरूवारी श्रध्देने उपास तव करिती। आंबट कोणी काही अन्न न सेवीती।।
गूळ चण्याचा साधा प्रसाद भक्षीती। मंगल व्हावे म्हणूनी कथा श्रवण करिती।।२।।
जे कोणी नरनारी व्रत तव आचरिती। अनन्य भावे तुजला स्मरूनी प्रार्थती।।
त्याच्या हाकेला तू धावूनिया येसी । संतती वैभव कीर्ती धनदौलत देसी।।३।।
विश्वाधारे माते प्रसन्न तू व्हावे। भवभय हरूनी आम्हा सदैव रक्षावे।।
मनीची इच्छा व्हावी परिपूर्ण सगळी। म्हणूनी मिलिंद माधव आरती ओवाळी।।४।।
Navratri Aarti Marathi | श्री नवरात्री देवीची आरती
उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो
उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो
उदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ ||
अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो
प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो
मूलमंत्र – जप करुनी भोवत रक्षक ठेवुनी हो
ब्रह्म विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो || १ ||
द्वितीयेचे दिवशी मिळती चौषष्ठ योगिनी हो
सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो
कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो
उदो:कार गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो || २ ||
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो
मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो
कणकेचे पदके कासे पितांबर पिवळा हो
अष्टभुजा मिरविसी अंबे सुंदर दिसे लीला हो || ३ ||
चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो
उपासका पाहसी माते प्रसन्न अंत:करणी हो
पूर्णकृपे जगन्माते पाहसी मनमोहनी हो
भक्तांच्या माउली सूर ते येती लोटांगणी हो || ४ ||
पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिता हो
अर्ध पाद्य पूजेने तुजला भवानी स्तवती हो
रात्रीचे समयी करती जागरण हरीकथा हो
आनंदे प्रेम ते आले सद् भावे ते ऋता हो || ५ ||
षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो
घेउनि दिवट्या हाती हर्षे गोंधळ घातला हो
कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो
जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो || ६ ||
सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो
तेथे तु नांदशी भोवती पुष्पे नानापरी हो
जाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो
भक्त संकटी पडता झेलुन घेशी वरचेवरी हो || ७ ||
अष्टमीचे दिवशी अंबा अष्टभुजा नारायणी हो
सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगद्जननी हो
मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो
स्तनपान देउनि सुखी केले अंत:करणी हो || ८ ||
नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो
सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी हो
षडरस अन्ने नेवैद्याशी अर्पियली भोजनी हो
आचार्य ब्राह्मणा तृप्तता केले कृपे करुनी हो || ९ ||
दशमीचे दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी हो
सिंहारूढ करि सबल शश्त्रे ती घेउनी हो
शुंभनीशुंभादीक राक्षसा किती मारसी राणी हो
विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो || १० ||
Mangalagauri Aarti | मंगळागौरी आरती
जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।।
रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।धृ।।
मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।।
तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया। ।1।।
पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा।।
सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे।।
पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली।।2।।
साळीचे तांदुळ मुगाची डाळ। आळणीं खिचडी रांधिती नारी।।
आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।।3।।
डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती। कळावी कांगणें गौरीला शोभती।।
शोभली बाजुबंद। कानीं कापांचे गवे। ल्यायिली अंबा शोभे।।4।।
न्हाउनी माखुनी मौनी बैसली। पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली।।
स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।।5।।
सोनिया ताटीं घातिल्या पंचारती। मध्यें उजळती कापुराच्या वाती।।
करा धूप दीप। आतां नैवेद्य षड्रस पक्वानें । तटीं भरा बोनें ।।6।।
लवलाहें तिघें काशीसी निघाली। माउली मंगळागौर भिजवूं विसरली।।
मागुती परतुनीयां आली। अंबा स्वयंभू देखिली।।
Tulsi Aarti | तुळशी आरती
जय देव जय देवी जय माये तुळशी ।
निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी ॥ धृ. ॥
ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी ।
अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं ॥
सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रें पापें हरती निर्धारी ॥ जय देवी. ॥ १ ॥
शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी ।
मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ।
सर्व दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी ॥ जय देवी. ॥ २ ॥
अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी ॥
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।
गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ॥ ३ ॥
Hartalika Aarti Marathi | हरतालिका आरती
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके।
आरती ओवाळीतें। ज्ञानदीपकळिके।। धृ.।।
हरअर्धांगी वससी। जासी यज्ञा माहेरासी।
तेथें अपमान पावसी। यज्ञकुंडींत गुप्त होसी। जय. ।।1।।
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके। आरती ओवाळीतें।
ज्ञानदीपकळिके।।
रिघसी हिमाद्रीच्या पोटी। कन्या होसी तू गोमटी।
उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी ।।जय. ।।2।।
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके। आरती ओवाळीतें।
ज्ञानदीपकळिके।।
तापपंचाग्निसाधनें। धूम्रपानें अधोवदनें।
केली बहु उपोषणें। शंभु भ्रताराकारणें। ।।जय.।।3।।
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके। आरती ओवाळीतें।
ज्ञानदीपकळिके।।
लीला दाखविसी दृष्टी। हें व्रत करिसी लोकांसाठी।
पुन्हां वरिसी धूर्जटी। मज रक्षावें संकटीं।। जय.।। 4।।
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके। आरती ओवाळीतें।
ज्ञानदीपकळिके।।
काय वर्ण तव गुण। अल्पमति नारायण।
मातें दाखवीं चरण। चुकवावें जन्म मरण। जय. देवी।।5।।
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके। आरती ओवाळीतें।
ज्ञानदीपकळिके।।
घालीन लोटांगण
घालीन लोटांगण वंदिन चरन ।
डोळ्यांनी पाहीं रुप तुझे ।
प्रेम आलिंगिन आनंदे पूजीं ।
भावे ओवालीन म्हणे नामा ।
त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वम मम देव देव ।
कयें वच मनसेन्द्रियैवा ।
बुद्धयात्मना व प्रकृतिस्वभावा ।
करोमि यद्यत सकलं परस्मै ।
नारायणायेति समर्पयामि ॥०१॥
अच्युत केशवम रामनरायणं ।
कृष्णदामोदरं वासुदेवं हरी ।
श्रीधरम माधवं गोपिकावल्लभं ।
जानकीनायकं रामचंद्रम भजे ॥०२॥
हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०३॥
हरे राम हरे राम ।
राम राम हरे हरे ।
हरे कृष्णा हरे कृष्णा ।
कृष्णा कृष्णा हरे हरे ॥०४॥
हे हि वाचा :
Leave a Reply